Year of Publication : 2017
Edition : 1
Pages : 132
₹200.00
हे पुस्तक मानवी शरीर आणि मनाची रचना, त्यांची कार्यपद्धती आणि त्यातील बिघाडांची (आजारांची) सविस्तर ओळख करून देते. डॉ. एम्. एम्. ढवळे मेमोरियल ट्रस्टच्या ३० वर्षांच्या ग्रामीण आरोग्य सेवेतील अनुभवावर आधारित या पुस्तकात विविध शरीरसंस्थांची माहिती अत्यंत सोप्या भाषेत मांडली आहे. पुस्तकातील असंख्य रेखाचित्रांमुळे क्लिष्ट विषय समजणे सुलभ होते. आरोग्य सेवक, वैद्यकीय व्यावसायिक आणि सर्वसामान्य वाचकांसाठी शरीरशास्त्र आणि होमिओपॅथीची सांगड घालणारे हे एक उत्कृष्ट मार्गदर्शक पुस्तक आहे. This second volume in the series provides a comprehensive yet accessible introduction to human anatomy and physiology. Based on 30 years of community health experience by the MLD Trust, it explores how the human body and mind function and the biological basis of various disorders. Richly illustrated with diagrams and written in simple language, it bridges medical science with homoeopathic principles, making it an essential resource for community health workers, students, and general readers.
प्रकाशन आणि अभिप्राय हे पुस्तक मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. (श्रीमती) स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते प्रकाशित झाले. त्यांच्या भाषणात त्यांनी मानवी शरीर, मन आणि शरीर समजून घेण्याच्या या पुस्तकाच्या दृष्टिकोनाचे कौतुक केले. त्यांना हे पुस्तक सोपे आणि परिपूर्ण वाटले असून, शहरी तसेच ग्रामीण भागातील रुग्णांसाठीही हे अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले.
क्षेत्राची साधी, स्पष्ट आणि व्यापक ओळख.Publication and Testimonial: This book was released by Dr (Mrs) Snehalata Deshmukh, former Vice-Chancellor of the University of Mumbai. In her address, she lauded the book’s approach to understanding the human body, mind, and soul. She found the book to be simple yet comprehensive, noting its immense utility for patients in both urban and rural areas.
Doctors, Homoeopaths, Students aspiring to make a noteworthy contribution to the life of patients
Marathi
Drawing upon 30 years of experience in healthcare delivery and volunteer training within the tribal region of Vikramgad, Palghar, the MLD Trust has developed this curriculum specifically for the training of tribal community health workers. The structured presentation and clarity of vision offered by the authors, Dr Sujata Goda and Dr Neena Ambedkar, are truly exemplary.
Dr. M. L. Dhawale Memorial Trust, Dr. M. L. Dhawale Memorial Trust Hospital, Opp. S. T. Workshop, Palghar – Boisar Road, Palghar – 401404
Email: publicationsmldt@gmail.com
Phone: 7720016342
Visit us at www.mldtrust.org
डॉ. एम्. एल्. ढवळे मेमोरियल ट्रस्ट हा विक्रमगड तालुक्यातील आदिवासींच्या आरोग्यविषयक समस्यांवर गेली ३० वर्षे काम करीत आहे. येथील अल्पशिक्षित आदिवासी स्त्रिया प्रशिक्षणानंतर आरोग्यासाठीची महत्त्वाची भूमिका समर्थपणे बजावत आहेत. आजार किरकोळ असले तर होमिओपॅथिक औषधांनी बरे करणे, मोठे असले तर रुग्णाला दवाखान्यात नेणे, तसेच आरोग्यपूर्ण जीवनासाठी संबंधित घटकांविषयी सल्ला देणे व कृतीसुद्धा करणे हे महत्त्वाचे काम त्या करतात.
ही पुस्तके त्यांच्या प्रशिक्षणाच्या अनुभवावर आधारित आहेत. त्यामुळे ती समजायला सोपी पण विषय पूर्णपणे मांडणारी आहेत.
आरोग्य म्हणजे नेमके काय आणि आपण आजारी का पडतो, तसेच समचिकित्साशास्त्राची (Homoeopathy) मूलभूत तत्त्वे यांची माहिती आपण पहिल्या पुस्तकात घेतली.
या पुस्तकात आपण मानवी शरीराची आणि मनाची रचना आणि कार्य, तसेच त्यामध्ये होणारे बिघाड यांची ओळख करून घेणार आहोत. विशेष म्हणजे यामध्ये आपण शरीराचा त्यातील संस्थांप्रमाणे (उदा. रक्ताभिसरण संस्था) विचार करणार आहोत.
पुस्तक असंख्य रेखाकृतींनी नटलेले असल्याने विषय समजणे नक्कीच आणखी सोपे जाईल.
माहिती सोप्या मराठीत असल्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागात काम करणाऱ्या अशा अनेक संस्था व वैद्यकीय व्यावसायिकांना व सर्वसामान्य वाचकांना याचा फायदा होईल.
या पुस्तकानंतरच्या इतर पुस्तकांमधून खालील विषयांबद्दल माहिती मिळेल:
हा अभ्यासक्रम कुठेही राबविण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन वेगळ्या पुस्तकामध्ये करण्यात येईल.
अशा प्रकारे ही सर्व पुस्तके सार्वजनिक आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संबंधितांना उत्कृष्ट मार्गदर्शन करतील. सर्वसामान्य वाचकांच्या आरोग्यविषयक आणि समचिकित्साशास्त्राबद्दलच्या शंकांनासुद्धा या पुस्तकांमधून उत्तरे मिळतील.
The Dr M.L. Dhawale Memorial Trust has been working on the health-related issues of the tribal population in Vikramgad taluka for the past 30 years. Following their training, semi-literate tribal women are effectively playing a vital role in healthcare. They perform the crucial tasks of treating minor ailments with homoeopathic medicines, ensuring patients with serious conditions reach hospitals, and providing advice as well as practical guidance for a healthy lifestyle.
These books are based on the experiences gained during their training. Consequently, they are easy to understand yet comprehensive in their subject matter.
While the first book introduced the definitions of health, why we fall ill, and the fundamental principles of Homoeopathy, this volume focuses on the structure and function of the human body and mind, as well as their malfunctions. Notably, the body is examined through its various systems (e.g. the circulatory system).
As the book is adorned with numerous diagrams, understanding the subject becomes even more straightforward.
Since the information is presented in simple Marathi, it will benefit various organisations and medical professionals working in both rural and urban areas, as well as general readers.
Subsequent books in this series will cover the following topics:
The necessary guidance for implementing this curriculum in any setting will be provided in a separate manual.
In this way, the entire series will provide excellent guidance to everyone involved in the public health sector. Furthermore, general readers will find answers to their queries regarding health and homoeopathy within these pages.
Reviews
There are no reviews yet.